भामरागड:वनविभाग अंतर्गत येत असलेल्या ताडगाव वनपरिक्षेत्रातील बोटनफुंडी उपक्षेत्रात “जागतिक बांबू दिवस” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक बांबू दिनानिमित्त ग्रामस्थ लोकांना वनाधिकाऱ्यांनी बांबूचे महत्व विशद करत जागतिक बांबू दिनानिमित्त बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. बोटनफुंडी उपक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक एन.एस. गुंडावार आणि कुडकेली चे वनरक्षक पी.डी.ओक्सा, यांनी उपस्थित गामस्थांना बांबूचे महत्व विशद करून सांगितले.बांबूचे लागवड करून आर्थिक विकास कसे करता येईल, यावर मदर्शन केले.
सर्वात वेगाने वाढणाऱ्या गवत वनस्पतींमध्ये बांबूचे नाव अग्रस्थानी आहे. ज्याचा उपयोग फर्निचर, खाद्यपदार्थ, इंधन, कपडे अशा अनेक गोष्टींमध्ये होतो. मानवाच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी बांबूची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. दक्षिण पूर्व आशियाई, पूर्व आशियाई देश आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये बांबूचा सर्वाधिक वापर केला जातो.
बांबूशी संबंधित फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि दैनंदिन उत्पादनांमध्ये त्याचा वापर वाढवण्यासाठी साजरा केला जातो. बांबू आणि बांबूपासून बनवलेल्या वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. बऱ्याच काळापासून बांबू कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वापरला जात आहे.बांबू वनस्पती नैसर्गिकरित्या कुठेही वाढू शकते.मृदा संवर्धनात बांबू महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण तो पुराच्या वेळी माती धरून ठेवतो.बांबूचे झाड नापीक जमीन किंवा खराब जमीन सुधारक म्हणून देखील कार्य करते.याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रम डी.जी. रामटेके, वनपरिक्षेत्र अधिकारी ताडगाव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.या कार्यक्रमात संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजु कारू आत्राम,व प्रमुख पाहुणे म्हणून इंदरशहा लच्चा वेलादी तसेच वनाधिकारी उपस्तिथ होते.कु.एस.एम. सिडाम वनरक्षक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रम वनरक्षक डी.आय. मडावी, वनरक्षक कु. डी. के. कुरसामी, वनमजूर सोनूले आदींनी सहकार्य केले.