सिरोंचा : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या पातागुडम पोलिस नक्षल शोध मोहीम राबवित असताना अतिसंवेदनशील, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त अश्या कोर्ला गावात पोहोचले.अहोरात्र कर्तव्य बजावून जनतेचं रक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांना बहिणीची उणीव भासू नये. त्यामुळे या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून त्यांनी त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरे केले.
पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या परिवारपासून दूर राहून आपले कर्तव्य बजवावे लागते. गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. याठिकाणी नेहमीच नक्षल शोध मोहीम राबविली जाते.सध्या रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.मात्र,छत्तीसगड सीमेवर महाराष्ट्राच्या शेवटचा टोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पातागुडम उप पोलिस स्टेशन अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना या सणानिमित्त आपल्या स्वागवी जाता आले नाही.त्यांना या सणापासून वंचित राहावे लागले.मात्र, सणासुदीच्या काळात पोलिस आपले कर्तव्य बजावत असल्याचे दिसताच आदिवासी महिलांनी पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपली सामाजिक बांधिलकी जपली.
पोलिसांनी सुद्धा आदिवासी भगिनींना साडीचोळी भेट देऊन उत्साह वाढविला.तर गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन कुठलीही अडचण भासल्यास सदैव पाठीशी खंभिरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी उपस्थित लहान बालकांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप केले.
अधिकाऱ्यांनी केल्या भावना व्यक्त
रक्षाबंधनच्या दिवशी बहिणी लांब गावी असतात, त्यामुळे रक्षाबंधन साजरे होत नाही. पण आज कोर्ला गावातील महिलांनी आम्हाला राख्या बांधल्या, त्यामुळे खूप आनंद झाला.आम्हाला एक नव्हे अनेक बहिणी आज मिळाल्या.अशा भावना येथील पोलिस अधिकारी अभिजित तुतूरवाड आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.