नव्या उपविभागीय अधिकाऱ्यापुढे आव्हन
गोंडपिपरी(सुरज माडुरवार)गोंडपिपरी तालुक्यात अवैध रेतीतस्कर अधूनमधून डोके वर काढत असतात.अश्यातच आता तालुक्यातील कुलथा घाटानजीक असलेल्या साठवणूकीतील रेतीची तस्करी जोमात सुरु आहे.अश्यावेळी तालुका प्रशासन मात्र कोमात असल्याचे दिसून येत आहे.
गोंडपिपरी तालुक्यात लिलाव झालेल्या रेतीघाटांपैकी कुलथा रेतीघाटावर साठवणूक करून असलेल्या रेती साठ्यातून मोठ्या प्रमाणात रोज रात्री विनापरवाना रेतीची वाहतूक होत आहे.लिलावानंतर मिळालेल्या परवाण्यापेक्षा चार पट रेती उत्खनन करून वाहतूक करण्यात आली.घाटाच्या परिसरात हजारो ब्रासचे मोठे ढिगारे उभे असून शिल्लक परवाण्यापेक्षा रेती जास्त असल्याचे आढळून येत आहे.रात्रीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात विना परवाना कुलथा वरून गोंडपिपरीला व वढोली-पोंभुर्णा मार्गे चंद्रपूरला मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक होत आहे.गोंडपिपरीत शिवाजी चौकातुन अनेक हायवा रोज रात्री सर्रासपणे जात आहे.विनापरवाना अवैध वाहतूक करताना प्रशासनाला हायवा न आढळणे शंकास्पद आहे.तालुक्यातील कुलथा घाटावरील रेती साठ्यावरून सध्या रेतीची तस्करी जोरात असून यातून अनेक तस्कर गब्बर झाले असून, ते सबकुछ मॅनेज है ची भाषा करीत आहे. रेती साठ्यावरून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती तस्करांनीच वेळा देखील ठरविल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे जिल्हा व तालुका प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून जिल्हा खनिकर्म विभाग व तालुका महसूल विभागाकडून केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली असल्याने रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नुकतच चार दिवसांपूर्वी पुणे येथून बदली होऊन नव्याने गोंडपिपरीत रुजू झालेले उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांच्यासमोर रेती तस्करी रोखण्याचे मोठे आव्हाहन असून अवैध रेती वाहतुकीच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई तथा अंकुश लावण्यासाठी काय कार्यवाही होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.