गोंडपिपरी :- तालुक्यातील सांस्कृतिक चळवळीचे गाव संतनगरी अशी पंचक्रोशीत ओळख असलेल्या वढोली येथे दि(३१)गुरुवारी ग्रामसभा पार पडली.वढोली हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील असून गावात मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवले जातात.धार्मिक उत्सव देखील थाटा माटात साजरे होतात.गावात सर्वांना समितीच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करणारे व सामाजिक,धार्मिक कार्यात नेहमी सक्रिय असल्याने गावकऱ्यांनी संदीप लाटकर यांना पाचव्यांदा अध्यक्ष पदाची संधी दिली.अविरोध निवडीनंतर लाटरक यांनी सर्वांना सोबत घेऊन समितीच्या ध्येय धोरणानुसार येणाऱ्या प्रत्येक तक्रारींचा योग्य न्याय निवाडा करण्याची ग्वाही दिली सरपंच राजेश कवठे,उपसरपंच बहिणाबाई देवाडे,बाजार समिती संचालक तथा ग्रा पं सदस्य सदीप पौरकार,शीला खरबनकर,आरोग्यसेवक रामटेके,अंगणवाडी सेविका अंजना झाडे,वंदना नामेवार,ग्रामसेवक विनोद झिले यांच्यासह अनेकांनी नवनियुक्त तमुस अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.