गोंडपिपरी -स्वातंत्र्यपूर्वीपासून भारतात होमगार्ड ही संघटना मुंबई प्रांतात स्थापित झाली होती.नंतर महाराष्ट्रात स्थापन झाली स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतरही महाराष्ट्रात ही संघटना दुर्लक्षित आहे. शासनाचे या संघटनेबाबत उदासीन धोरण असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड योग्य त्या सुविधेपासून आजही वंचित असतात मात्र हीच संघटना इतर राज्यात नियमित आहे. महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील होमगार्डला नियमित कायमस्वरूपी ३६५ दिवसाचे कर्तव्य बंदोबस्त स्वरूपातच्या माध्यमातून रोजगार मिळत आहे. यासह शासकीय प्रशासकीय लोकसेवकाप्रमाणे इतर शासकीय सोयी सुविधांचे लाभ मिळतात .परंतु होमगार्ड संघटनेचे मातृत्व लाभलेल्या महाराष्ट्रातील होमगार्डवर राज्य शासन व संबंधित गृह विभागीय प्रशासन हे दुर्लक्ष करून अन्याय करत आहे.करिता होमगार्ड संघटनेच्या महत्वाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी दि.(२९) मंगळवारी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना विविध मागण्यांचे निवेदन होमगार्ड तालुका संघटनेने व शिवसेनेने संयुक्तरीत्या दिले असून मागण्या शासन स्तरावर मांडुन प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.यामध्ये पोलीस विभागाप्रमाणेच दर आर्थिक वर्षी आर्थिक बजेट सत्रात होमगार्ड विभाग करिता स्वतंत्र बजेटची व्यवस्था करावी,३६५ दिवस नियमित करण्यात यावे,पेन्शन योजना लागू करण्यात यावी,होमगार्ड विभागाचा दर्जा व वर्ग ठरवण्यात यावे,सेवानिवृत्त वयोमर्यादा साठ वर्ष करण्यात यावे अशा अनेक मागण्यांचे निवेदन आमदारांना देण्यात आले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुरज माडुरवार,युवासेना तालुकाप्रमुख तुकाराम सातपुते,युवासेना शहर प्रमुख विवेक राणा,होमगार्ड संघटनेचे मारुती मोहूर्ले,भैय्याजी एकोणकर,केशव गोहणे,भास्कर लिंगनपल्लीवार,रियाज शेख,प्रणय कोहपरे,सुनील कोसरे,अमोल चौधरी,प्रमोद पेंढारकर, सुजित भोयर,सुरज पेंढारकर,संदीप चलाख,गिरीधर जनगणवार,शरद कोरडे,शैलेश झाडे,दशरथ फलके, विवेकानंद गुरुनुले,कमलाकर ढुमणे, शैलेश दुर्योधन,महेश आत्राम, भारत उपासे,जनार्धन नगारे,निलेश चीलंनकर,जगन्नाथ ढगे, शिंदे, मायाबाई बट्टे,निवृत्त गेडाम,वनिता पिपरे,जीवनकला मडावी यांची उपस्थिती होती
सार्वजनिक उत्सवात शांतता सुव्यवस्था राहावी या करिता होमगार्ड काम करताना दिसतात.नंतर त्यांना कुणी कामावर बोलावत नाही हा अन्याय आहे कायमस्वरूपी ३६५ दिवस त्यांना सेवेत सामावून घ्यावे-सुरज माडुरवार तालुका प्रमुख शिवसेना(उबाठा)गोंडपिपरी