गोंडपिपरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने देशभर सुरू असलेल्या मोदी @९ महा-जनसंपर्क तथा घर चलो अभियानाच्या पार्श्वभूमीवर राजुरा विधानसभेचे निवडणूक प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दि.(२७) रविवारी गोंडपिपरी तालुक्यातून घर चलो अभियानाला सुरवात करत झंझावाती दौरा केला.
यादरम्यान त्यांनी तालुक्यातील सुरगाव,लिखितवाडा,वडकुली, चेकबेरडी व वढोली येथे घरोघरी नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना मोदी सरकारच्या ९ वर्षांतील योजना व विकासकामांची पत्रके देत माहिती दिली.सोबतच आगामी काळात मोदी सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचे आवाहनही त्यांनी ठिकठिकाणी जाहीर सभेतून केलेल्या मनोगतातून व्यक्त केले.
भोंगळे यांच्या अभियानात सुरगाव, पुरडीहेटी, भनारहेटी, लिखितवाडा, वडकुली, चेकबेरडी व वढोली येथील शेकडो जेष्ठ तसेच युवकांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. त्या सर्वांच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे टाकून त्यांनी स्वागत केले.
यावेळी तालुकाध्यक्ष बबन निकोडे, शहराध्यक्ष चेतन गौर, माजी पं. स. सभापती दिपक सातपुते,माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार,बाजारसमिती संचालक सुहास माडुरवार,गणपती चौधरी,संजय झाडे,माजी उपसभापती विनोद देशमुख,महिला तालुका अध्यक्ष सुरेखा श्रीकोंडावार,गणेश डहाळे, नाना येल्लेवार,महिला शहर अध्यक्ष अरूणा जांभुळकर,ग्राम पंचायत सदस्य संदीप पौरकार,सरपंच अण्णा उलेंदला,संतोष मुघलकर,राकेश पुन, कोमल फरकाडे,नगरसेविका मनिषा मडावी,मनिषा दुर्योधन,अस्मिता राफलवार,चंद्रकला भोयर,पंकज चिलनकर,रोशन ठेंगणे आदिंसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती