मुलचेरा:तालुक्यातील पोलीस मदत केंद्र बोल्लेपल्ली व पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून चंदनवेली येथे भव्य कृषी व जनजागरण मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या निमित्याने मेळाव्यात शेतकऱ्यांना कृषी उपयोगी साहित्य,विविध दाखले वाटप करण्यात आले. यावेळी मंचावर माजी आ. दिपक आत्राम,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड,आविस सल्लागार तथा माजी जि.प.सदस्य कारूजी रापंजी,आविस सल्लागार तथा माजी जि.प.सदस्य संजयजी चरडुके,बोल्लेपल्ली पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मोरे,पोलीस उपनिरीक्षक जंगले,कृषी अधिकारी मडावी,ग्रा प सदस्य रमेश वेलादी,मुख्याध्यापक सुखदेवे,प्रभारी मुख्याध्यापक जि प शाळा तलांडे,माजी सरपंच कालंगा,पोलीस पाटील कुडयेटी,प्रतिष्ठित नागरीक राजेंद्र वैरागडे,खेडचंद्र वैरागडे
भारत राष्ट्र समितीचे नेते,आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्याहस्ते शेतकऱ्यांना शेतीचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनात दुर्गम भागात पोलीस विभागाकडून सुरू केलेल्या पोलीस दादालोरा खिडकीचे प्रसंशा करतानाच या माध्यमातून गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना तसेच युवक युवतींना विविध योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत असून शैक्षणिक व इतर दाखल्यासाठी भटकंती थांबली असल्याचे मत व्यक्त केले.एवढेच नव्हेतर या मेळाव्याच्या निमित्याने पोलीस विभाग व जनतेचा थेट संबंध आल्याने दोघांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होत असल्याचे म्हटले.उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड व कृषी अधिकारी मडावी यांनी उपस्थित जनतेला मोलाचे मार्गदर्शन केले. या मेळाव्याला पोलिस मदत केंद्र हद्दीतील नागरिक व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर मेळाव्याचे संचलन व आभार प्रदर्शन शिक्षक सोनवणे यांनी केले.
*युवक युवतींसाठी सुसज्ज वाचनालय*
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोप्पल यांच्या संकल्पनेतून ‘एक गाव एक वाचनालय’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने बोलेपल्ली पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेल्या चंदनवेली येथे सुसज्ज वाचनालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धा परीक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी तसेच त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी यासाठी ‘एक गाव एक वाचनालय’ हा उपक्रम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोप्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले असून सुशिक्षित युवक युवतींनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी केले.