वरोरा:- भुसंपादीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित नौक-या तात्काळ देण्याची मागणी केंद्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्लीचे डॉ.अंकुश आगलावे यांनी घुग्घुस येथील वेकोलि विश्राम गृहात आयोजित बैठकीत दरम्यान केली आहे.
या बैठकीत केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहीर, वेकोलिचे अध्यक्ष तथा पं्रबंध निदेशक, जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रपूर व यवतमाळ, बल्लारपूर, माजरी, वणी, वणी नार्थ, चंद्रपूर वेकोलि एरियाचे प्रबंधक उपस्थित होते. यावेळी डॉ. आगलावे यांनी माजरी क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित नौकरी तात्काळ मिळावी याकरीता अहीर यांना मागणी केली.
याबैठकीत अहीर यांनी वेकोलि एरियात वाढत्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त करत यावर तात्काळ कठोर उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. तसेच वेकोलिचे केंद्रीय हॉस्पीटल मध्ये रूग्णांना होणा-या असुविधाबाबत माहिती दिली त्यात सिटी स्कॅन व इतर उपकरण उपलब्ध करून देण्याचे सांगितले. या बैठकीत अनेक प्रकल्पग्रस्त उपस्थित होते त्यांच्या मागण्या लक्षात घेवून जुनी आर आर पॉलीसाचा अवलंब करत नौकरी प्रदान करावी व वेकोलित महिलांना नौकरीत प्राधान्य देण्याचे सांगितले.
यावेळी कोळसा चोरी, स्क्रॅप, डिझेल चोरी, रेल्वे वॅगेनमध्ये चोरी, असे अनेक गुन्हयात असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून यावर प्रतिबंधत्माक उपाय योजना करण्याच्या तथा सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्याच्याही सुचना यावेळी अहीर यांनी दिले. वेकोलित सुरक्षारक्षकाचे जबाबदा-यांची जाणीव करत जास्त प्रमाणात संुरक्षा कर्मचा-यांच्या तैनात करण्याचे सांगितले.
वेकोलित भुमीअधिग्रहन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नौकरीत सामावून घेण्यात यावे, बल्लारपूर, माजरी, वणी, वणी नार्थ, चंद्रपूर वेकोलि एरियात झालेल्या भुसंपादीत प्रकल्पग्रस्तांच्या नौक-या प्रलंबित असून तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचना यावेळी अहीर यांनी दिले