भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघ युगपुरुष स्वामी विवेकानंद विद्यार्थी बहुउद्देशीय संस्था यांच्या विद्यमाने महाविद्यालयात “आंतरराष्ट्रीय उद्यमिता दिनाचे” औचित्य साधून उद्यमिता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टुनकर होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्रसिद्ध कंत्राटदार सुनील पोटदुखे, भारतीय जीवन विमा निगम अभिकर्ता अमित नेरकर,माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक डॉ .जयवंत काकडे, रासेयो विभाग प्रमुख डॉ. उत्तम घोसरे, मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश पारेलवार व समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अमोल ठाकरे उपस्थित होते. विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश केंद्र सरकारच्या धोरणानुसार “आत्मनिर्भर भारत” अंतर्गत भारताचा तरुण नोकरी मागणारा न होता नोकरी देणारा व्हावा हा होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ .जयवंत काकडे, संचालन प्रा. अमोल ठाकरे आभार डॉ. उत्तम घोसरे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्निल नन्नावरे, शितल ढोणे, संगीता नन्नावरे, काजल सोनवणे, पुनम गजबे, आचल पाटील, सीमा पाल, सुहानी हेपट, आभा भांदककर, डॉ. यशवंत घुमे यांनी सहकार्य केले.