अहेरी:-येथील मॉडेल स्कुल मध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना कळताच त्यांनी संबंधित विभागाला एक फोन कॉल केला अन येथील मॉडेल स्कुल ला नुकतेच तीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली.त्यामुळे पालकांनी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे आभार मानले आहे.
मॉडेल स्कुल मध्ये 6 वी ते 10 पर्यंत शेकडो विध्यार्थी शिक्षण घेतात.दरवर्षी इयत्ता 5 व्या वर्गाची प्रवेश परीक्षा पास करून याठिकाणी प्रवेश घेतात.विविध तुकड्यात जवळपास 200 विध्यार्थी शिक्षण घेतात.त्यात मुलींची संख्या अधिक आहे.एकूण 5 तुकड्या करिता मुख्याध्यापक वगळता 4 शिक्षक कार्यरत होते.त्यापैकी केवळ एकच महिला शिक्षक होते.ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार यांनी निवेदनाच्या माध्यमातून कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना निदर्शनास आणून दिली.
त्यांनतर क्षणाचाही वाट न बघता कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा यांनी संबंधित विभागाला निर्देश देऊन त्वरित शिखकांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले.विशेष म्हणजे त्यावेळी धर्मराव बाबा आत्राम हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथही घेतली नव्हती.मात्र,आमदार या नात्याने त्यांच्या शब्दाचे मान ठेवून आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी येथे तीन शिक्षकांचे संयोजन करण्यात आले.त्यात निलेश विश्रोजवार,मनोज झाडे,कु गीता वैरागडे यांचा समावेश आहे.