वरोरा:- जामगांव (बू.) येथे शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनास पोहोचलेल्या कृषीकन्यांनी बिजप्रकिया प्रत्यक्षिक रिता शेतकरा पुढे मांडायचा प्रयत्न केला . ही बिजप्रक्रिया जामगांव (बू.) येथे शेतकऱ्यांच्या पुढे करण्यात आले . डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोल्याशी सांलगणित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय ,आनंदवन वरोरा येथील विद्यार्थिनींनी बिजप्रक्रियेचे प्रत्यक्षिक करून दाखवले .
या प्रत्यक्षिक कृषीकन्यांचा प्रयत्न असा राहिला की पेरणीपुर्व बिजप्रक्रियेतून सोयाबीन वरील किड रोगांना प्रतिबंध कसा करता येईल याची माहिती शेतकऱ्यांना दिली.आणी बिजप्रक्रियेतून कसे जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येईल हे कृषीकन्यांनी समजावले .
बिजप्रक्रियेमध्ये बुरशीनाशक थाईरम ज्याचे प्रमाण 3gm/kg अशे असावे ज्याचे फायदे कृषीकन्यांनी समजावले . त्याचप्रमाने बिजप्रक्रिया राईझोबियम द्वारा ही केल्या जाऊ शकते ज्याचे प्रमाण 20gm/kg असावे असे कृषिकन्यांनी सांगितले .
सदर उपक्रमात आंनद निकेतन कृषी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.एस.पोतदार,कार्यक्रम प्रभारी डॉ. आर.वी.महाजन ,तसेच कार्यक्रम समन्व्यक डॉ.एस.एन.पंचाभाई,विषय मार्गदर्शक डॉ.ए.ए.मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
शेतकऱ्यांना मार्गदर्शनाकरिता आयोजित या कार्यक्रमामध्ये जामगांव येथे पोहोचलेल्या कृषिकन्यां मध्ये , अश्विनीसोनवाने, वैष्णवी राऊत, मानसी ताकवले , झील सोमकुंवर ,धनश्री शेरकी , यांचा समावेश होता.