भद्रावती : भद्रावती नाभिक समाज , नाभिक सलुन दुकानदार असोसिएशन, नाभिक युवा शक्ती तसेच नाभिक महिला संघटनेच्या वतीने भद्रावती येथील तहसिलदार अनिकेत सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. नाभिक समाजातील कु. निलिमा सुधाकर चव्हाण राहणार ओमळी, तहसील चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथील नाभिक कन्येवर अमानुष अत्याचार करून अमानुषपणे तिची हत्या करण्यात आली. चेहरा विद्रूप करून तिला टाकून देण्यात आले. ज्यांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
याच आशयाची मागणी असलेल्या निवेदनाच्या प्रतिलीपी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रतिभा धानोरकर,चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना पोस्टलद्वारे देण्यात आल्या.यावेळी भद्रावती नाभिक समाजातील विविध संघठनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.ज्यात प्रामुख्याने हरीश घुमे, मधुकर वाटेकर, वर्षा वाटेकर, सचीन नक्षिणे,बंडू व्ही.लांडगे, ज्योती लांडगे, शोभा लांडगे, हनुमान नक्षिणे, बंडू एम.लांडगे,सागर घुमे,सतीश मांडवकर,सुधीर लांडगे,पियुष घुमे, छत्रपती दैवलकर,, सविता लांडगे, नंदिनी लांडगे, वैशाली दळवी,सतीश जांभूळकर, अंकुश दर्वे,विजय मेश्राम, गणेश दैवलकर आदी नाभिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.