गडचिरोली:- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथे १५ ऑगस्टला आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार ना. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते गडचिरोली येथे शासकीय ध्वजारोहण होणार आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात ध्वजारोहण करणार आहेत.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम हे १२ ऑगस्टला दुपारी दीड वाजता गडचिरोली जिल्ह्यात येत आहेत, अहेरी येथे त्यांचे आगमन होणार असून ते मुक्कामी राहणार आहेत.