वरोरा :- डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोल्याशी संलग्नित, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथील विद्यार्थिनींनी 8 ऑगस्टला हॉर्टिकल्चर दिनानिमित्त मजरा (रै) येथील शेतकऱ्यांच्या घरी जावून त्यांच्या अंगणात पळसबाग तयार करण्यात मदत करीत भाजीपाल्यांच्या रोपांची लागवड करून मार्गदर्शन केले.
हॉर्टिकल्चर दिनाच्या निमित्ताने या कृषीकन्यांनी शेतकरी मित्रांना भाजपाला लागवड , त्या झाडांचे संगोपन या बाबत मार्गदर्शन करीत प्रत्याक्षिका द्वारे त्यांची पळसबाग फुलविण्यात मदत त्याच सोबत शेतकरी आणि विद्यार्थिनींनी एकत्र येऊन परिसरात वृक्ष लागवड केली .
सदर उपक्रम आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस पोद्दार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. वि. महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पंचभाई
,डॉ.अनिल भोगावे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.सदर उपक्रमामध्ये देवश्री राठोड, प्रिती सरकार, आकांक्षा रहांगडाले, पायल पिसे, जुही सोनुले, सेजल सोमकुंवर यांच्यासोबतच्या वरिष्ठ युवा कृषीकन्यांनी सहकार्य केले.