गोंडपिपरी-(सुरज माडुरवार) :- राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील शेतकऱ्यांशी रविवारी अतिवृष्टी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी सवांद साधला.
याप्रसंगी ग्रामस्थांकडून अडचणी जाणून घेतल्या.यामध्ये शेतीच्या नुकसानीचे पंचनामे,पांदण रस्त्याच्या अडचणी,घरांची पडझड आदी समस्यांचे गाऱ्हाणे नागरिकांनी आमदारांपुढे कथन केले.यावेळी आमदारांनी समंधीत अधिकाऱ्यांना समस्या सोडवण्याचे निर्देश देत मी स्वतः लक्ष घालणार तुमच्या समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन दिले.सोबतच मागील महिन्यात आलेल्या पुरात दिवाकर कोहपरे या शेतकऱ्याचे दोन बैल पाण्यात वाहून गेले.त्यांना यावेळी ५७ हजारांचा मदतीचा चेक देण्यात आला.नुकसानीचे पंचनामे योग्य करा शेतकरी मदतीपासून वंचीत राहू नये यासाठी प्राथमिक याद्या ग्रामपंचायत बाहेर लावावे असे निर्देश दिले.यावेळी तहसीलदार शुभम बहाकर, संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर,तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे,तलाठी कोलावार, ग्रामसेवक विनोद झिले,काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,तालुका कार्याध्यक्ष बाजार समिती संचालक निलेश संगमवार,संचालक अशोक रेचनकर,माजी संचालक शंभू येलेकर,सरपंच राजेश कवठे,सदस्य सुवर्णा पोलोजवार,सदस्य संदीप पौरकार यांच्यासह गावातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती