गोंडपिपरी – गावाजवळील दोन तलाव फुटल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील करंजी गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. गावात पाणी शिरल्याने जवळपास १०० घरांना याचा फटका बसलाय.करंजी हे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे जन्म गाव. पुराची माहिती मिळताच वडेट्टीवार,राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी गाव गाठले. गावाकऱ्यांशी संवाद साधला.पूरग्रस्त २५ कुटुंबाला आर्थिक मदत केली. मी असेपर्यंत करंजी गावाच्या मदतीला धावून येईल,असे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले.
बुधवारच्या रात्री गोंडपिंपरी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने करंजी गावाजवळ असलेल्या दोन तलावांची पाळ फुटली.करंजी गावात अनेकांच्या घरात पाणी शिरले.जवळपास अडीच ते तीन फूट पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य, संसारोपयोगी सामान आणि शेतीला लागणाऱ्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.करंजी हे गाव माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे जन्म गाव आहे.पुराची माहिती मिळताच विजय वडेट्टीवार यांनी आज दि. ( शनिवार ) करंजी गाव गाठले.राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यावेळी हजर होते.वडेट्टीवार, धोटे यांनी पूरग्रस्त घरांची पाहणी केली.पूरग्रसताना धीर दिला.पूरग्रसताना आर्थिक मदत केली.सोबतच मी जिवंत असेपर्यंत करंजी व गोंडपिपरी तालुक्याच्या जनतेच्या सोबत असनार असा शब्द देत नागरिकांना धीर दिला.यावेळी माजी नगराध्यक्ष घनशाम मूलचंदानी, विनायक बांगळे,नंदू नागरकर,तहसीलदार शुभम बहाकर,बीडीओ शालीक माऊलीकर,सिंचन विभागाचे रायपुरे,मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे,ठाणेदार जीवन राजगुरू,कोठारीचे ठाणेदार गायकवाड,काँग्रेस तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,तालुका कार्याध्यक्ष तथा बाजार समिती संचालक निलेश संगमवार,शहर अध्यक्ष देवेंद्र बटे,नगराध्यक्ष सविता कुळमेथे,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार, नगरसेवक सचिन चिंतावार,सुरेश चिलनकर,सुनील संकुलवार,तालुका उपाध्यक्ष नितेश मेश्राम,सरपंच देविदास सातपुते,कमलेश निमगडे,बाजार समिती संचालक अशोक रेचनकर,संचालक संतोष बंडावार,माजी उपसभापती तुकेश वानोडे,माजी ग्रा पं सदस्य सारनाथ बक्षी,सामाजिक कार्यकर्ता वैभव निमगडे,संजय माडुरवार,सेवादल जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिवावास्कर,माजी प स सदस्य सिनू कंदनुरीवार,माजी उपसरपंच गौतम झाडे,सरपंच सरिता पेटकर,ग्रा प सदस्य महेंद्र कुंघटकर,नितीन धानोरकर,विनोद नागापुरे,आशिष निमगडे,दामोदर गरपल्लीवार यांच्यासह अनेक काँग्रेस व परिसरातील नागरिकांची महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाने शेतीची नुकसान झाली ,घराची पडझड झाली.नागरीक पुरपरस्थितिने त्रस्त आहे आणि प्रसिद्धीसाठी सत्ताधारी लोकार्पण करण्यात व्यस्त आहे.अशी भावना आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त करत .स्थगिती दिलेल्या विकासकामावरील बंदी उठवावी असे मत व्यक्त केले.सोबतच करंजी,आकसापूर सह तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाली तेथील तातळीने पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले