खेकडे पकडणे बितले जीवावर
गोंडपिपरी(सुरज माडुरवार)
तोहंगाव येथील शिंदी घाटावर वर्धा नदीच्या पात्रात खेकळे पकडायला गेलेली तीन मुले वाहून गेल्याची दुदैवी घटना गोंडपिपरी तालुक्यात काल दि.(८) शनिवारी दुपारी दोन वाजता दरम्यान घडली.
पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.लगेच पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली.आज पहाटेला ६.३० वाजता १ ते २ किलोमीटर अंतरावर शोध मोहिमेला यश आले. वाहून गेलेल्यापैकी प्रतिक नेताजी जुनघरे या मुलाचा मृतदेह सापडला आहे.मृतदेह बघताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला.निर्दोष रंगारी अद्याप सापडला नाही.पोलिसांची शोध मोहीम सुरु आहे.शोध मोहिमेदरम्यान आज पुन्हा ११ वाजता दरम्यान आर्वी पुलाजवळव सोनल सुरेश रायपुरे याचे प्रेत सापडले.तर जवळच १२ वाजता दरम्यान निर्दोष ईशवर रंगारीचे मृतदेह सापडले. या दुदैवी घटनेने गावात शोककळा पसरली आहे.