गोंडपिपरी – गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील उद्धव खरबनकर यांच्या मालकीच्या एका बैलाला दि.(६) बुधवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान सर्पदंश झाला या बैलाचा उपचाराविना काही वेळातच गोठ्यात मृत्यू झाला.
अगोदरच पावसाने हुलकावणी दिल्याने दुबार पेरणीची वेळ आली असून शेतकरी हवालदिल झालेला आहे.अशातच बैल सर्पदंशाने मृत्यू झाल्याने शेतकऱ्याची चाळीस हजारांची नुकसान झाली आहे.शासनाकडूनही सर्पदंशाने जनावरांचा मृत्यू झाल्यास तात्काळ नुकसानीची भरपाईची तरतुत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.सर्पदनशाने जनावर दगावल्यास तात्काळ मदतीची तरतूद करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.तालुका पशु वैधकीय अधिकारी डॉ खोब्रागडे ,पशु वैधकीय पर्यवेक्षक कतलाम यांनी भेट देत पंचनामा करून मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठवला आहे.ऐन शेतीहंगाम सुरू असताना बैलाचा मृत्यू झाल्याने शेती कशी करायची असा प्रश्न खरबनकर यांच्या समोर उभा झाला असून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी तंमुस अध्यक्ष संदीप लाटकर यांनी केली आहे