गोंडपिपरी -(सुरज माडुरवार):- मुल मार्गे येणाऱ्या गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या ट्रकला गोंडपिपरी पोलिसांनी आज दि.६ ( मंगळवारी) सकाळी ९ वाजता दरम्यान वाहन पकडून कारवाई करण्यात आली.
मुल – गोंडपिपरी मार्गे काही दिवसांपासून मोठ्या प्रमानावर गोवंशीय जनावरांची अवैद्य रित्या वाहतूक होत आहे.अनेक कारवाया होताना दिसत आहे मंगळवारी ट्रक क्रमांक MH 34 AB 6629 वाहणाने जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ठाणेदार जीवन राजगुरू यांच्यासह पोलिसांनी वढोली पासून ट्रक चा सिनेस्टाईल पाठलाग केला ट्रक सुसाट सुरगाव ,भंगाराम तळोधी मार्गे तेलंगणाच्या दिशेने गेले पाठलाग करून सकमुर किरमिरी येथे पोलिसांना वाहन अडवण्यात यश मिळाले.वाहन चालक घटना स्थळावरून फरार झाला असून अब्दुल अमीर कादिर या मजुराला पाठलाग करून अटक करण्यात आली व चालक मात्र पसार होण्यात यशस्वी ठरला.४१ जनावरांची सुटका करून वैद्यकीय तपासणी करून लोहारा येथील उज्वल गोशाळेत जनावरांना ठेवण्यासाठी रवाना करण्यात आले.आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ च्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे