गडचिरोली: जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून मुलचेरा पंचायत समितीचे माजी सभापती सुवर्णा येमुलवार यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.26 मे रोजी मुलचेरा येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राकॉ मध्ये प्रवेश केला.
सुवर्णा येमुलवार यांनी 2017 मध्ये काँग्रेस पक्षाकडून पंचायत समितीची निवडणूक लढवली होती. सुंदरनगर-गोमनी जिल्हा परिषद क्षेत्रातून रवींद्र निर्मल शहा यांच्या पॅनल मध्ये त्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. एवढेच नव्हेतर तर पहिल्यांदा निवडून येताच त्यांची सभापती पदी वर्णी लागली.तर,अडीच वर्षानंतर दुसऱ्या टर्मला पुनःश्च सभापती पदावर विराजमान होऊन तब्बल 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला.विशेष म्हणजे तत्कालीन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र निर्मल शहा यांच्यामुळे गुरुदास तिंम्मा आणि सुवर्णा येमुलवार यांना मोठा फायदा झाला.2017 च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रवींद्र शहा यांनी आपला पॅनल निवडून आणला होता.
2017 मध्येच सुंदरनगर गणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी पंचायत समिती सभापती आशा विठ्ठल निखुले यांचा 565 मतांनी पराभव केला होता.मागील काही दिवसांपासून त्या काँग्रेसला सोडचिट्टी देणार असल्याची चर्चा होती.अखेर 26 मे रोजी आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत चर्चांना पूर्णविराम दिला.यासोबतच विवेकानंदपुर येथील अपूर्व मुजुमदार,सुंदरनगर चे ग्रा.प.सदस्य श्यामल पाल,भवतोष दास आदींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
आ धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुलचेरा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, तालुका कार्यकारी अध्यक्ष मनोज बंडावार,शहर अध्यक्ष मनोज कर्मकार, राकॉ चे जेष्ठ नेते रंजित स्वर्णकार, नगरपंचायत चे उपाध्यक्ष मधुकर वेलादी,नगरसेविका मनीषा गेडाम, नगरसेविका सपना मडावी,नगरसेविका मंगला आलाम,माजी नगराध्यक्ष सुभाष आत्राम,ग्रा प सदस्य अतींद्र शील,ग्रा प सदस्य निखिल इज्जतदार,विष्णू रॉय, मारोती पल्लो आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.