गोंडपिपरी :- येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली.यात कधी नव्हे ते पहिल्यांदाच भाजपा नेते,माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळाले.नव्या सवंगळ्यांना सोबतीला घेऊन बोडलावारांनी पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात खिंड लढवली.आणि एकतर्फी विजय मिळविला.१८ पैकी तब्बल १२ संचालक निवडूण आणले.अन् गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर ३२ वर्षानंतर पहिल्यांदाच भगवा फडकला.या विजयाचे आणि बोडलावारांच्या कुशल नेतृत्वाचे पालकमंत्री मुनगंटिवारांनी कौतूक केले आहे.अश्यातच रविवारी(दि.२१) चंद्रपूर येथिल डाॕ.श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नवनियुक्त सभापती,उपसभापती आणि संचालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गोंडपिपरी कृउबासचे सभापती ईंद्रपाल धुडसे,उपसभापती स्वप्निल अनमुलवार यांचेसह नवनियुक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बबन निकोडे,कार्याध्यक्ष साईनाथ मास्टे,पं.स.चे माजी सभापती दिपक सातपूते,जेष्ठ कार्यकर्ते दिपक बोनगिरवार,नगरसेवक चेतनसिंह गौर,महिला तालुकाध्यक्ष सुरेखा श्रिकोंडावार,नगरसेविका मनिषा मडावी,मनिषा दुर्योधन,कोमल फरकडे,अॕड.अरुणा जांभूळकर यांचेसह नवनिर्वाचित संचालक निलेश पुलगमकर,समिर निमगडे,चंद्रजित गव्हारे,संदिप पौरकार,संजना अम्मावार आदिंची उपस्थिती होती.