चिमूर :- शंकरपूर येथे तीन मार्च ते 9 मार्च या सात दिवसात भागवत सप्ताहाचे आयोजन वृंदावन धाम हनुमान किल्ला मंदिर येथे संपन्न झाले या सात दिवसांमध्ये दररोज भारुड कीर्तन भजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केल्या गेले होते व नऊ मार्चला शेगाव येथील ह भ प रामकृष्ण महाराज यांच्या हस्ते गोपाल काल्याचे कार्यक्रम व महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन भागवत सप्ताहाची सांगता झाली
शंकरपूर येथे गेल्या 43 वर्षापासून भागवत सप्ताह गावकऱ्यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो कोरोना काळातील दोन वर्षे सोडली तर यावर्षीही हा भागवत सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सप्ताह निमित्त 8 मार्च ला सायंकाळी पाच वाजता भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले या शोभा यात्रेला हजारोंच्या संख्येने महिला पुरुष व बालगोपाल उपस्थित होते
या भागवत प्रवचनात सन 1993 पासून शेगाव येथील ह.भ. प रामकृष्ण ताकोते महाराज यांनी सेवा दिली त्या सेवा प्रित्यर्थ मंडळाच्या वतीने त्यांचा आज शाल श्रीफळ व पाच हजार रुपयाची देणगी देऊन सत्कार करण्यात आला या सत्कारवेळी माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.अविनाश वारजुकर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ.सतिश वारजूकर मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते शामराव शेंडे, भाऊराव बावनकर ,गुलाबराव बावनकर, प्राध्यापक रमेश सावरकर चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय गावंडे माजी सैनिक गंगाधर चौधरी ह भ प प्रदीप महाराज टाले उपस्थित होते