गोंडपिपरी(सुरज माडुरवार) :- जिल्ह्यात होत असलेल्या गौण खनिज तस्करी बद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना खडे बोल सुनावले.जिल्हाधिकारी विनय यांच्या सुचनेनंतर कर्तव्यदक्ष गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढवळे ऍक्टिव्ह होऊन धडाकेबाज कारवाया करत आहे.
दि.(८) शनीवारी रात्री दोन च्या दरम्यान रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना नूर मोहम्मद यांच्या मालकीचे MH 34 BG 8386 व आमिर खान यांच्या मालकीचे MH 34 BZ4996 क्रमांकाचा हायवा महाखनिक ऑनलाईन प्रणालीवर तपासला असता जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी ४ तासापेक्षा जास्त घेतले त्यामुळे ऑनलाईन प्रणालीवर अवैद्य दाखवल्यामुळे जप्त करण्यात आला.यावेळी कारवाई दरम्यान फ्लाईंग स्कॉड मध्ये नायब तहसीलदार अविनाश शेंबटवाड, तलाठी सुरज राठोड,पोलीस पाटील जांकिराम झाडे,साईनाथ धुडसे,पोलीस कर्मचारी प्रशांत नैताम,कोतवाल गेडाम,राहुल भोयर उपस्थित होते.उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात महिन्याभरात अनेक हायवा,ट्रॅक्टर,पोकलँड वर कारवाया केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी रेती तस्करी रोखण्यासाठी महसूल पथकाची नेमणूक केली दरम्यान 24 तास हे पथक कार्यान्वित राहणार आहे.या पथकात तलाठी कोतवाल दोन पोलीस कर्मचारी,पोलीस पाटलासह एका अधिकाऱ्याचा सुद्धा समावेश राहणार आहे दररोज हे फिरते पथक तीन शिफ्टवर काम करणार आहे.पथकाला कार्यवाहीसाठी मदत व्हावी म्हणून ज्या प्रकारे पोलीस विभागाकडून नागरिकांसाठी १०० क्रमांक जारी करण्यात आला त्याच धर्तीवर येतील अधिकाऱ्यांनी जनतेसाठी 90 96 73 59 36 हा क्रमांक ठेवला आहे या क्रमांकावर केवळ गौण खनिजाच्या कार्यवाही संदर्भातच तक्रारी स्वीकारल्या जातील असे आव्हान जाहीर करण्यात आले.नुकतंच फ्लाईड स्कॉड ने धडक कारवाई केली आहे.