गोंडपिपरी-(सुरज माडुरवार):-गोंडपिपरी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या खरारपेठ येथील पाथलवाडा रीट मध्ये शेतशिवारात मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली.
खरारपेठ येथील शेतकरी टीकाराम अवथरे यांच्या शेतातील विहरित गावातील काही नागरिकांना अज्ञात इसमाचा मृतदेह विहरित असल्याचे निदर्शनास येताच गावात दबक्या आवाजात चर्चा होती.शेतमालकाला दि.२ (रविवारी) माहिती कळताच शेतकरी अवथरे यांनी रात्रीच पोलीस स्टेशन गाठत सदर माहिती पोलिसांना दिली.दि.(३) ठाणेदार राजगुरू यांच्या मार्गदर्शनात शनिवारी पीएसआय पटले,शांताराम पाल,उईके,अमित गुरनुले पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करत गावकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सकाळी ९ वाजता युवकाचा मृतदेह काढला.कुटुंबियांकडून ओडख पटवली असता तो मृतदेह वढोली येथील अमित चरणदास शेंडे वय (३०) याचा असून शरीराच्या व्याधीने त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते.तो गेल्या ५ दिवसांपासून घरून निघाला परत न आल्याने घरच्यांनी पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती अखेर अमितचा मृतदेह आढळला.अमितच्या पच्यात आई-वडील,पत्नी,दोन वर्षांची मुलगी असा आप्त परिवार असून अमितच्या आत्महत्येमुळे गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केल्या जात आहे.