भद्रावती:- जीवनातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे लहान मुलांना दिलेले संस्कार आहे असे प्रतिपादन डॉ. अंकुश आगलावे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष केंद्रीय मानवाधिकार संगठन, दिल्ली यांनी केले. डॉ. आगलावे यांनी दिलेला शब्द पाळून नागलोन मंदीरात रामनवमी निमित्त विदेही सदगुरू श्री जगन्नाथ महाराज यांची अडीच फुटाची मुर्ती कै. किसन पैकाजी आगलावे यांचे स्मृति प्रित्यर्थ भेट दिली.
यावेळी डॉ. आगलावे यांनी सांगितले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज याप्रमाणेच जगन्नाथ बाबा यांचे सामाजिक व धार्मीक कार्य महान असल्याचे मत व्यक्त केले. दर महिन्याच्या 16 तारखेला जगन्नाथ महाराजाचा महाप्रसादाचा असतो. जगन्नाथ महाराजांचे 1000 हून अधिक मंदीर महाराष्ट्र, छत्तीसगढ व आंध्रप्रदेश येथे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. .
याप्रसंगी प्रविण सुर, माजी जिप. सदस्य, नरेंद्र जीवतोडे आदर्श गावांचे जनक नंदोरी, , पोलीस पाटील महाजन , गजानन ढवस, आनंद ढवस, सरपंच ढवस, तंटामुक्ती अध्यक्ष महाजन व समस्त नागलोन गावकरी उपस्थित होते.