चंद्रपूर :- राष्ट्रीय आरोग्य अभियान, मातृ संस्था स्टापी पुणे व प्रकृती महिला विकास केंद्र चंद्रपूर द्वारा ‘कम्युनिटी ॲक्शन फॉर हेल्थ’ या कार्यक्रमांतर्गत बुद्धिस्ट समन्वय कृती समिती सभागृह चंद्रपूर येथे तालुकास्तरीय जनसंवादाचे आयोजन करण्यात आले.
जनसंवादात पॅनल सदस्य म्हणून डॉ. शृंगारे सर ता.आ.अधिकारी चंद्रपूर, एम.एस.नन्नावरे आ.वि.अधिकारी चंद्रपूर, मालती सगणे राज्य निमंत्रक म.रा.आंदोलन महाराष्ट्र, डॉ.अमित जयस्वाल वै.अधिकारी प्रा.आ.केंद्र दुर्गापुर, डॉ.अनघा उंदीरवाडे वै.अधिकारी प्रा.आ.केंद्र घुग्गूस, पंकज ढेंगारे माजी पं.स.सदस्य चंद्रपूर, अविनाश आंबेकर जिल्हाध्यक्ष भ्र.नि.स चंद्रपूर, वंदनाताई जांभुळकर नगरसेविका महानगरपालिका चंद्रपूर, निलेश देवतळे जिल्हा समन्वयक, अक्षय देशमुख जिल्हा क्षेत्र पर्यवेक्षक उपस्थित होते.
जनसंवादाचे प्रस्ताविक व भूमिका निलेश देवतळे यांनी केले, जनसंवाद कार्यक्रमाची पार्श्वभूमी अक्षय देशमुख यांनी मांडली तर डॉ.शृंगारे तालुका आरोग्य अधिकारी यांनी जनसंवाद कार्यक्रम प्रत्येक तालुक्यात घ्यायला पाहिजे जनसंवादातून बरेच प्रश्नाचे निराकरण होतात यामुळे नागरिकांना समाधान मिळते असे मनोगत व्यक्त केले.
सदर जनसंवाद कार्यक्रमात ग्रामस्थांनी गावातील व तालुक्यातील आरोग्य, रोजगार, स्वच्छता, शिक्षण, बांधकाम, संदर्भ सेवा, रस्ते, पाणी, बांधकाम, रिक्त पदे इत्यादी विविध विषयावरील प्रश्न उपस्थित केले.
कार्यक्रमाचे संचालन अक्षय देशमुख यांनी केले तर आभार मंगला घटे यांनी मानले. या जनसंवादाच्या यशस्वीतेसाठी शितल पाटील, अरुणा खोब्रागडे, दिक्षा ठमके यांनी सहकार्य केले.
यावेळी जनसंवाद कार्यक्रमात तालुक्यातील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, आशा गतप्रवर्तक, अं.सेविका, आशा वर्कर, ग्राम आरोग्य दूत, बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.