कोरची :- तालुक्यातील – बेतकाठी गावात प्रतिष्ठित नागरिक हकीमुद्दीन शेख यांचे नातू मोईन इमरानुद्दीन शेख याने ६ वर्षाच्या कमी वयात सुद्धा आज आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला. एवढ्या कमी वयात रोजा पूर्ण केल्याबद्दल मोईन शेखचा सगळीकडे कौतुक केले जात आहे.
इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला खूप मोठे महत्व प्राप्त आहे. लहानपासून मोठ्यापर्यंत या महिन्यांमध्ये रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकलेही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात. विशेष म्हणजे, देसाईगंज येथील पाच वर्षाच्या कौसेन नाजीम शेख व सात वर्षाच्या जैद नाजीम शेख या चिमुकल्यांनीदेखील रमजानचे रोजे ठेवले आहेत.