गोंडपिपरी:– शिक्षकांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणारी प्राथमिक शिक्षक पतपुरवठा सहकारी संस्थेची निवडणूक २६ फेब्रुवारी २०२३ ला पार पडली यात परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवित ११ पैकी ८ जागेवर सदस्य निवडून आणले तर केवळ तीन जागेवर विजय मिळवित एकता पॅनलला समाधान मानावे लागले. निवडून आलेल्या सदस्यांची १७ मार्च २०२३ रोजी प्राथमिक शिक्षक पतपुरवठा गोंडपीपरी या कार्यालयात बैठक घेऊन अध्यक्षपदी गुणाकार जुमानके मानद सचिव पदी शैलेश झाडे तर खजिनदार पदी विद्या सयाम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्राथमिक शिक्षक पतपुरवठा सहकारी संस्था मर्या गोंडपिपरी या संस्थेचा कार्यकाळ संपल्याने २०२३ ते २०२८ या कालावधी करिता २६ फेब्रुवारी ला निवडणूक घेण्यात आली यात परिवर्तन पॅनल व एकता पॅनल यांच्याकडून उमेदवार उभे करण्यात आले सर्वोदय विद्यालय गोंडपिंपरी येथे सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सरपाते यांनी निकाल जाहीर केला यात परिवर्तन पॅनल चे गुणाकार जुमनाके, शेखर दहिवले,शैलेश झाडे,पुरुषोत्तम वसाके,प्रमोद दुर्गे,आनंद कोंडेवाड,विद्या सयाम व सुचिता वाकडे हे विजयी झाले तर एकता पॅनल चे रत्नाकर चौधरी,गुणवंत कुबडे,सुधाकर कन्नाके यांनी विजय मिळविला.
दिनांक १७ मार्च२०२३ रोजी पार पडलेल्या बैठकीत अध्यक्ष म्हणून बिनविरोध गुणाकार जुमनाके,मानद सचिव पदी शैलेश झाडे तर खजिनदार पदी विद्या सयाम यांची एकमताने निवड करण्यात आली.