गडचिरोली:मराठी भाषेत व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असून त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करावी व मराठी भाषेचे सौंदर्य जाणून संवाद कौशल्य विकसित करावे असे प्रतिपादन प्रा.डॉ. अनिरुद्ध गचके यांनी केले. मराठी भाषा पंधरवडा उपक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना संचालक तथा मराठी विभाग समन्वयक डॉ.श्याम खंडारे ,प्रमुख अतिथी म्हणून इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. प्रमोद जावरे व मराठी विभागाचे प्रा. पुडलिक शेंडे मंचावर उपस्थित होते. मराठी भाषा पंधरवड्या निमित्त मराठी विभागांतर्गत १४ते२८जानेवारी दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थी त्यामध्ये उत्फूर्तपणे सहभागी झाले होते.
विद्यापीठातील मराठी भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष या नात्याने समारोपीय कार्यक्रमात डाकराम कोहपरे या विद्यार्थ्यांने आपले मनोगत व्यक्त केले.मराठी भाषा पंधरवडा या उपक्रमाचे औचित्य साधून पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाच्या वतीने मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन व काव्यवाचन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये डॉ. सविता गोविंदवार, सहाय्यक प्रा. मराठी विभाग यांनी विद्यार्थ्यांना कथाकथन कौशल्याचे धडे दिले. त्याचप्रमाणे प्रा. शुभम बुटले यांनी काव्य वाचनाचे प्रशिक्षण दिले. या उपक्रमांतर्गत विद्याथ्यांनी पुस्तकाची निवड करून पुस्तक परीक्षण केले.
या समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता गोविंदवार यांनी तर आभार प्रा. प्रियंका बघमारे यांनी केले. कार्यक्रमाला पदवीधर शैक्षणिक विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.