वरोरा :- येथील शेषरत्न बहुउद्देशीय संस्था बोर्डा,वरोरा यांच्याकडून संस्था उद्घाटन निमित्ताने एक दिवशीय आरोग्य शिबिर तथा रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन साई मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले होते..
संस्थेच्या उद्घाटन सोहळा निम्मित मोफत आरोग्य शिबिर तथा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.. या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून ना.गो. थुटे , अहेतेशाम अली माजी नगराध्यक्ष, रमेश राजुरकर सामाजिक कार्यकर्ते, करण देवतळे प्रदेश सचिव भा.ज.यु.मो. शुभांगी कोलते माजी पाणी पुरवठा सभापती न.प.वर्धा, हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन आरती रोडे यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष धिरज लाकडे यांनी केले असुन , प्रास्ताविक भाषणामध्ये धिरज लाकडे यांनी आपले विचार मांडत आपल्या संस्थेचे कार्य निराधार, अपंग व्यक्ती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, रुग्णसेवक तसेच कोविड महामारी काळात आपल्या जिवाची परवा न करता तालुक्यातील कोविड पेशंटला बेड , ऑक्सिजन उपल्बध करुन दिले असून कोविड काळामध्ये त्यांच्याकडून 35 गरिब लोकांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले व कोविड काळात सर्व गरिब नागरिकांना राशन किट पोहचवुन आधार दिला. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांमध्ये आरोग्य जागृती निर्माण करणे हा उद्देश या संस्थेचा होता. Health is wealth. आरोग्य शिबिर घेण्यामागचे कॅम्पचे उद्देश. संस्थेचे अध्यक्ष धिरज लाकडे यांनी समजावून सांगितले
या संस्थेमार्फत,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे,रोटरी क्लब वरोरा, गांधी उद्यान योग मंडळ वरोरा यांचा सत्कार करण्यात आला.
एक दिवसीय आरोग्य शिबिर तथा रक्तदान शिबिरामध्ये, सिकल सेल ,थायरॉईड, बीपी,शुगर, एच बी, Electrophoresis, .ब्रेस्ट कॅन्सर, या कार्यक्रमात तालुक्यातील अनेक नागरिकांनी आरोग्य शिबिरात येऊन फायदा घेतला तसेच अनेक युवक युवतींनी रक्तदान करुन ” रक्तदान सर्व श्रेष्ठ दान” एक छान संदेश नागरिकांना दिला.
या कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कार्याबद्दल प्रशंसा केली, या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित आरोग्य तपासणी पथक, उपजिल्हा रुग्णालय वरोरा, सरकारी रक्तपेढी चंद्रपुर, ब्रेस्ट कैन्सर टिम नागपुर ,या सर्वांंचे सौ.मंगला डांगरे यांनी आभार मानले…
तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता धिरज लाकडे, डाॅ. पवन डोंगरे, रवींद्र सहारे, रत्नमाला लाकडे, ओम चावरे, प्रतिभा ढगे, किरण ढेंबरे, डाॅ.मेहरदिप हटवार, प्रशांत कुळकर्णी, आरती रोडे, मंगला डांगरे,अमोल सेलकर, अजय धांडे, पियुष वाढई, शेखर हनवते इत्यादी संस्थेचे पदाधिकारी तसेच सदस्य यांनी सहकार्य केले