गोंडपिपरी-(सुरज माडुरवार) : गोंडपिपरी कडून आष्टी मार्गे जाणारी MH 20 DV 3711 स्कॉर्पिओ चारचाकी वाहन आष्टी वैनगंगा नदीत अनियंत्रित होऊन कोसळल्याची खळबळजनक घटना आज दि.(१७) सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली .अपघातात चालक मालक असलेला अनमोल दुपारे जागीच ठार झाला.
आष्टी पुलावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला भरधाव येणारे वाहन नदीत कोसळताना दिसले त्यांनी सदर माहिती पोलिसांना दिली.घटनास्थळी तहसीलदार के डी मेश्राम,ठाणेदार जीवन राजगुरू दाखल होऊन गोंडपिपरी पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवली .पाण्याची पातळी जास्त असल्याने वाहन काढायला मोठी कसरत करावी लागली तब्बल ३ तासानंतर क्रेन च्या साहाय्याने गाडी काढण्यात यश आले.
चंद्रपूर जवळील छोटा नागपूर येथील अनमोल दुपारे वय (२५) याचा मृतदेह आढळला.प्राप्त माहितीनुसार त्याची बहीण आलापल्ली येथे राहात असल्याने बहिणीला भेटण्यासाठी तो स्वताच्याच गाडीने निघाला होता.अशी माहिती समोर येत आहे