गोंडपिपरी (सुरज माडुरवार):- धानापूर गावाजवळ पांदण रस्यालगत असलेल्या माधव देवराव लडके यांच्या शेततलावात नागरिकांचया अंदाजानुसार डुकराच्या कळपाला घाबरून बैल जोडी शेततळ्यात घुसली त्यात भास्कर बापूजी साळवे वय (४३) या शेतकऱ्याचा व बैल आणि गायीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.(१६) रविवारी घडली.
सायंकाळी ६ वाजता शेतातील काम आटपून घरी परत येत असताना अचानक बैल घाबरुन पळाले आणि बंडी अनियंत्रित होऊन रस्त्यालगत असलेल्या शेततलावात घुसली कसाबसा एक बैल सुटुन घरी आला नंतर घरच्यांनी शोध घेतला असता एक बैल ,एक गाय मृत अवस्थेत पाण्यात दिसली घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
आज सकाळ पासुन गावकऱ्यांच्या सहकाऱ्यांने आपत्ती व्यवस्थापन च्या पथकाने तहसीलदार के डी मेश्राम,ठाणेदार राजगुरु यांच्या उपस्थितीत शोधमोहीम असता दुपारी १२ वाजता अखेर भास्कर साळवे यांचा मृतदेह सापडला.भास्कर च्या पच्यात वृद्ध आई,पत्नी,आणि तीन मुली असा मोठा आप्त परिवार असल्याने कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने गावात हळळलं व्यक्त केल्या जात आहे.