चंद्रपूर-:- वढोली येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील १५ दिवसांपासून बंद आहे.परिणामी या योजनेत समाविष्ट असलेल्या सहा गावांना पाणी टंचाईची झळ बसली आहे. काही गावात नैसर्गिक पाण्याचे स्रोत नसल्याने नाल्यातील गढूळ पाण्याने तहान भागवण्याची दुर्दैवी वेळ गावकऱ्यांवर आली.
वढोली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून वढोली सह सहा गावांची तहान भागविली जाते.
ही योजना ठेकेदारामार्फत चालवली जाते या योजनेअंतर्गत वढोली,तारडा,फुर्डी हेटी,खरारपेठ,बोरगाव,चेकबोरगाव,लिखितवाडा या गावांचा समावेश आहे.पाण्यासाठी दाही दिशा महिलांना भटकावे लागत आहे आज पाणीपुरवठा सुरू न झाल्यास उद्या पंचायत समिती वर गावकरी धडक देणार असल्याची माहिती आहे