गोंडपिपरी : तालुक्यातील गोजोली येथील रहिवासी गणपती सोनूले या शेतकऱ्याने वनविभागाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सूरू आहे. या पिडीत व्यक्तिची माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी रुग्णालयात भेट घेवून लवकर तब्येतीत सूधारणा व्हावी म्हणून शूभेच्छा दिल्या व उपचारासाठी आर्थिक मदत केली. व यापुढेही काही समस्या उद्भवल्यास मदतीचे आश्वासनहि दिले. त्यामुळे पीडित कूटूंबीयांनी सुद्धा आभार प्रकट केले.
यावेळी स्वप्नील अनमूलवार ग्रा पं.सदस्य धाबा, सूरज भस्की, रूग्णाची बहीण गयाबाई शेंडे, हरीश घोगरे, आदि उपस्थित होते.