वरोरा : यावर्षीची परिस्थिती पाहता शेतीला यावर्षी सुगीचे दिवस राहील असे वाटत नाही. अतीवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या यावर्षीच्या उत्पन्नावर होणार आहे. त्यात राज्य शासन देखील वारंवार मागणी करून एकरी मदत देण्यास अनिर्णीत आहे. पीक कर्ज जर एकरी मिळते तर मदत देखील एकरी मिळावी, अशी मागणी आहे. मात्र निसर्ग व शासन दोन्हीही शेतकऱ्याला मारक ठरेल तर शेतकऱ्यांचा वाली उरणार नाही. अशा परिस्थितीत कास्तकार जगला तरच समाज जगेल, असे विचार रवि शिंदे यांनी मांडले. निमित्त होते माढेळी व शेगाव येथे ए.टी.एम. मशीन लोकार्पनाचे…
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा माढेळी व शाखा शेगाव येथे नागरिकांना सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ए.टी.एम. मशीनचे लोकार्पण सोहळा कार्यक्रम आज (दि.२८) ला घेण्यात आला. यावेळी रवि शिंदे बोलत होते.
यावेळी आयोजित कार्यक्रमात स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे उद्घाटक होते. प्रमुख उपस्थिती डॉ. विजय देवतळे, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रकाशबाबु मुथा, दत्ता बोरेकर, दामोधर रुयारकर, माढेळी ग्रामपंचायत सरपंच देवानंद महाजन यांची होती. तर कार्यक्रमाला विभागीय अधिकारी राजीव पिंपळापुरे, सुधीर धात्रक, साहेबराव काकडे, सुधीर धामट, बाळू भोयर, गजानन बजाईत, धनराज तळवेकर, अजय चटप, भीमराव वाटकर, चेतन महाजन, प्रभाकर हणवते, नरेश चौधरी, हस्तीक ताजने, मनोज शेळकी, विठ्ठल हणवते, पंढरी श्रीरामे, गोपाळराव चौधरी, सौ. रंजना वरभे, जीवतोडे, राऊत, जांभुळे, सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी, सभासद, ग्राहक आदी उपस्थित होते.