गोंडपिपरी-(सुरज माडुरवार) :- मृत आजीच्या नावाने असणाऱ्या जमिनीवर वारसान चढवण्यासाठी फिर्यादीला चार हजाराची तलाठी यांनी मागणी केल्यावर शेतकऱ्याच्या तक्रारीवरून तलाठ्याला दोन हजाराची लाच घेताना रंगेहात पकडल्याची खळबळजनक घटना आज दि.(२८) बुधवारी घडली.
धाबा येथील शेतकरी आकाश हजारे यांना सातबाऱ्यावर वारसान चढवायचे असल्याने वारंवार तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागले त्यानंतर तलाठी ओंकार संजय भदाडे यांनी 4000 रु ची मागणी केली तडजोडीअंती 2000 रु कोतवाल चंद्रकांत मुंजेकर यांच्या हाताने लाचेची रक्कम स्वीकारली त्यावेळी लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली.सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मर्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, पोलीस कर्मचारी नरेश ननावरे, संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, काचोळे, सतीश सिडाम यांनी पार पाडली.