गोंडपिपरी(सुरज माडुरवार) :- गोंडपिपरी पोलीस स्टेशनला लिखितवाडा येथील शेकडो नागरिकांनी धडक देत गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली.लीखीतवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू असून तात्काळ बंद व्हावी करिता ग्रामपंचायत ने ठराव घेऊन दारूविक्री करताना आढळल्यास १० हजार रु दंड करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला सोबतच पोलीस विभागाने कारवाया कराव्या मागणीला घेऊन गावातील बचत गटाच्या महिला, तंटामुक्त समिती,ग्रामपंचायत कमिटी संयुक्तरित्या पोलीस स्टेशनला धडक देऊन अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ठाणेदार जीवन राजगुरू यांना निवेदन दिले.लिखितवाड्याची ओळख सधन शेतकऱ्यांचे गाव म्हणून तालुक्यात ओळखल्या जाते.शेती हा मुख्य व्यवसाय असून शेतीच्या उत्पन्नातूनच आपली उपजीविका करून अगदी गुण्या गोविंदाने सर्व नांदतात.मात्र चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी जेव्हापासून उठली तेव्हा पासून गावात अवैध दारूविक्री मुळे शांतता भंग झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.गावातीलच काही व्यक्ती हा अवैध दारूविक्री धंदा करीत असून सुखाने नांदणारे संसार आज घडीला उघड्यावर आले आहेत याचा कमालीचा त्रास हा महिलांना सहन करावा लागत असल्याने गावात दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी मागणीचे निवेदन ठाणेदारांना दिले यावेळी सरपंच भाग्यश्री आदे,उपसरपंच हरीचंद्र मडावी,ग्रा.पं सदस्य कोमल फरकडे, प्रभाकर कोहपरे,माया कोहपरे,पुष्पां राऊत,प्रतिमा चंद्रगिरीवार या सदस्यांसह तं.मु.स अध्यक्ष पुरुषोत्तम नेवारे, हरीचंद्र वाढई,अमर बांगरे,प्रवीन ढुमने,जिजाबाई गावडे,दीपा मडावी,संगीता धंदरे, मायाबाई कोहपरे यांच्यासह शेकडो गावकऱ्यांची उपस्थिती होती.