गोंडपिपरी(सुरज माडुरवार) :- विहरित उडी घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची हृद्ययद्रायक घटना दि.३ शनिवारी सकाळी ६ च्या दरम्यान गोंडपीपरित घडली.
आंनद ऊर्फ ( गेंडा )शंकर आत्राम वय (३०) असे युवकाचे नाव असून घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नवरसेवक सचिन चिंतावार यांच्या विहरित युवकाने आज सकाळी ६ च्या दरम्यान उडी घेतली लोकांनी विहरिकडे धाव घेतली परंतु त्याचा बुळून मृत्यू झाला होता.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली ठाणेदार जीवन राजगुरू यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवले.आत्महत्येचं कारण अद्याप कडले नसून युवक दारूच्या नशेत होता सोबतच पायाचा त्रास असल्याने आजाराला कंटाळून आत्महत्या केली असावी अशी चर्चा आहे.आनंद च्या पच्यात बराच मोठा आप्त परिवार आहे.