चंद्रपूर:- (आशिष घुमे) ;-जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्शवभूमीवर गोंडपीपरीत काँग्रेस ला मोठी खिंडार पडली आहे.
काँग्रेस चे जेष्ठ नेते बाजारसमिती सभापती सुरेश चौधरी यांचे चिरंजीव राहुल चौधरी यांनी काल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
राहुल चौधरी यांचे कुटुंबीय काँग्रेस चे निष्ठावंत म्हणून तालुक्यात ओडखले जायचे चौधरी कुटुंबीयांचा मोठा जनसंपर्क तालुक्यात आहे.आमदार सुभाष धोटेनच्या विजयात मोठे योगदान तालुक्यात चौधरी कुटुंबियांचे असायचे.राहुल चौधरींच्या प्रवेशाने मोठी राजकीय खळबळ माजली असून लवकरच शेकडो कार्यकर्ते व काही काँग्रेस पदाधिकारी देखील काँग्रेसला रामराम करणार असल्याची चर्चा तालुक्यात असून भाजपला राहुल चौधरींच्या प्रवेशाने संघटनात्मक फायदा होईल असे मत भाजपचे माजी आमदार संजय धोटे यांनी व्यक्त केले