चंद्रपूर-मागील आठवड्यात तालुक्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती.अशात तोहगावातील साहिल आजारी पडला .डोंग्याचा आधाराने त्याला गावाबाहेर काढून पुढील उपचारासाठी शहरात नेन्यात आले.उपचारादरम्यान साहिलची प्राण ज्योत मावळली .संततधार पावसामुळे तोहंगाव परिसरातील पीके पुरात नष्ट झाले अशातच काल पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यास आलेले कोंडया महाराज देवस्थान कमेटिचे अध्यक्ष माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी वाघाडे कुटुंबियांना सांत्वन भेट देत कुटुंबाला दहा हजार रुपये मदत करून शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत प्रयत्न करनार असल्याचे सांगितले.यावेळी किशोर कासनगोट्टूवार, बालू गरपल्लीवार, अभिनव उत्तरवार, अतूल बूक्कावार, योगेश खामनकर ,संदिप बूक्कावार,हंसराज पेद्दीवार ,निलकंठ मत्ते, संदिप मोरे उपस्थित होते