इम्फाळ (वृत्तसंस्था):मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे.
#WATCH | NDRF, SDRF, State Government and Railways workers involved in rescue work at the landslide-hit Tupul station building in Noney, Manipur
(Video credit: CPRO, NF Railway) pic.twitter.com/N7zo2pLaY7— ANI (@ANI) June 30, 2022
यात घटनेत लष्कराचा एक आर्मी कॅम्प मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेल्याचे सांगितले जात असून, आतापर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 19 जणांना वाचवण्यात यश आले असून, गंभीर जखमींना नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहे. सध्या घटनास्थळी मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तुपुल रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. https://twitter.com/ANI/status/1542433721218805760?t=RdXKjxtjPxRGHRerciar3Q&s=19
जिरीबामला इम्फाळशी जोडण्यासाठी एक रेल्वे मार्ग तयार करण्यात येत होता, ज्याच्या संरक्षणासाठी 107 टेरिटोरिल तुकडीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अचानक भूस्खलन झाले. ज्यात अनेकजण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच याठिकाणी लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.