भद्रावती :- कालपरत्वे सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला आहे. बँकींग क्षेत्रात नवनवीन आव्हाने निर्माण झाली आहे. त्या सर्वांचा प्रतिकार करीत शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, महिला बचत गट , विविध क्षेत्रातील कर्मचारी आणि गरजूंना विविध योजनांच्या माध्यमातून अविरतपणे सन्मानपूर्वक उत्कृष्ठ सेवा देण्याचे कार्य चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करीत आहे. यामुळेच ह्या बँकेचे स्थान सर्वसामान्य जनतेच्या द्ददयात असल्याचे प्रतिपादन बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रविंद्र शिंदे यांनी केले.
तालुक्यातील आदर्श ग्राम चंदनखेडा येथे आज दि. १२ जून २०२२ रोज रविवार ला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंदनखेडा येथे सुरू करण्यात आलेल्या एटीएमच्या लोकार्पण प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यस्थानावरून सामाजिक कार्यकर्ते तथा बँकेचे संचालक रविंद्र शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. याप्रसंगी व्यासपिठावर उदघाटक म्हणून
जिल्हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत,बँकेचे संचालक डॉ.विजय देवतळे , संचालक दामोधर रुयारकर,मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर ,मूल
बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, बॅंक ऑफ इंडियाचे चंद्रकांत दांडेकर , सरपंच नयन जांभूळे , सरपंच बंडू पा.नन्नावरे , बाळासाहेब पडवे,भारत जिवतोडे, सहकारी संस्था चंदनखेडाचे अध्यक्ष भारत जिवतोडे , आदिवासी सहकारी संस्था आष्टाचे अध्यक्ष राजेंद्र कारमेंघे , आदिवासी सहकारी संस्था मुधोलीचे अध्यक्ष शंकर गायकवाड, आणि आदिवासी सहकारी संस्था मोहलीचे अध्यक्ष कृष्णराव नन्नावरे उपस्थित होते.
चंदनखेडा हा परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असून शेतकरी, शेतमजूर,महिला बचत गट, विविध क्षेत्रातील कर्मचारी तसेच इतर बंधू -भगिनींचे बँक खाते असून ग्राहकांना मिळत असलेल्या योग्य सेवेमुळेच या बँकेकडे खातेदाराचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांची अडचण लक्षात घेऊन संचालक मंडळींनी एटीएम केंद्र सुरू करून दिल्याचे बॅकेंचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना म्हटले. सरपंच नयन जांभुळे , बँकेचे संचालक डॉ. विजय देवतळे आणि बँकेचे संचालक दामोदर रुयारकर यांनी सुध्दा समयोचित मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बँक ग्राहक , बचत गटाच्या महिला पदाधिकारी, ग्रामस्थ बंधू -भगिनी व बँक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक मुन्ना शेख, सुत्रसंचलन सदानंद आगबत्तनवार व आभार प्रदर्शन पवन ठाकरे यांनी केले. ( ता. प्र. )