भिवंडी ( देविदास एखंडे ) भिवंडी तालुक्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखली जाणारी शिवनेरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, खार्डी भिवंडी होय,या पतसंस्थेला १७ वर्ष पूर्ण होऊन १८ व्या वर्षात पदार्पण केले आहे ही अभिमानाची गोष्ट आहे कारण ही पतसंस्था सह्याद्री नागरी पतसंस्थेचा आदर्श घेऊन पुढे जाताना दिसत आहे, सदर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक संस्थेचे संस्थापक कमलाकर आत्माराम तांगडी व वैधानिक लेखापरीक्षक सहकारी संस्था नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली,
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार महर्षी तथा शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास थळे
आवर्जून उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून डॉ.किशोर बळीराम पाटील (संपादक – दैनिक स्वराज्य तोरण) त्याचप्रमाणे पतसंस्थेचे नव निर्वाचित अध्यक्ष विनोद गंगाराम म्हात्रे, नव निर्वाचित उपाध्यक्ष .प्रवीण गोविंद पाटील ,मावळते अध्यक्ष मंगलदास चांगो म्हात्रे, मावलत्या उपाध्यक्षा सुनिता भालचंद्र म्हात्रे, सन्माननीय संचालक मंडल गुरुनाथ सखाराम म्हात्रे, कमलाकर शंकर खारखंडी, रतिलाल जगन्नाथ नाईक, महादेव नवश्या हांडवा, अविनाश दिनकर पाटील, . अमृत नारायण देवळीकर,जय जगन्नाथ पाटील,दमयंती कमलाकर तांगडी, तसेच शिवाजी सखाराम भोईर( मुख्य कार्यकारी अधिकारी) गणेश म्हात्रे(बाबगाव नाका शाखाधिकारी ) नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद म्हात्रे यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र मंडळी, सगेसोयरे व कालवार गावातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये अनेक सहकार पतसंस्था व इतर संस्था आहेत,पन त्या देखील आता पुढे येताना दिसत आहेत, माणूस किती शिकला त्याला अर्थ नाही परंतु त्याचे व्यक्तिमत्व सांगताना तो कशाप्रकारे सांगतो व तो पुढे जातो याला अर्थ आहे, अशी अनेक माणसं आपल्या मधून पुढे गेली आहेत,
कोव्हिड १९ काळामध्ये पतसंस्था चालू ठेवायची की नाही याबाबत आम्ही सर्वांनी निर्णय घेऊन पतसंस्था सुरु ठेवली याचा एक फायदा झाला, सर्वांच्या मनामध्ये सह्याद्री चे नाव रुजले गेले कारण जर पतसंस्था बंद ठेवली असती तर लोकांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो नसतो असे वाटले म्हणून पतसंस्था चालू ठेवल्यामुळे लोकांचा विश्वास आम्ही संपादन केला ज्यांचे पैसे होते त्यांना वेळेवर मिळाले, व अजून ठेवीदार वाढले, एखाद्या जनावराला माया दिली तर ते जनावर आपलं होते आपण तर माणसेच आहोत म्हणून माणसाने माणसावर प्रेम केलं तर निश्चितच बदल घडेल असे मला वाटते व तेच काम आता नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद म्हात्रे उपाध्यक्ष प्रवीण पाटील हे करतील अशी मला अपेक्षा वाटते ,सहकार नुसतं चाखायचं असतं ते गिलायच नसत ज्यांनी गिलण्याचा प्रयत्न केला ते अपयशी ठरले, ठाणे जिल्ह्यातील सर्व पतसंस्थेचे संचालक हे तुमचे विश्वस्त आहेत, मालक नाहीत, व मालक म्हणून आम्ही वागत पण नाही, म्हणून प्रत्येकाने एकमेकांना समजून घेऊ या दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचे आपण जेव्हा हास्य बघतो त्याला मिळालेले सुख बघतो तेच आपलं सुख आहे, म्हणून अध्यक्षपदाची खुर्ची ही काट्यासारखी आहे त्यासाठी आपण त्या काट्यावर बसून काम करायला शिकलो पाहिजे, खिशामध्ये पैसे नसले तरी चालतील मात्र पतसंस्थेचा पैसा हा पतसंस्थेच्याच कामासाठी लागला पाहिजे जेणेकरून आपल्या पदाची प्रतिमा उंचावेल असे काम करा असे सहकार महर्षी तथा सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास थळे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.
विश्वास थळे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वजण एकत्र मिळून काम करू, व पतसंस्थेच्या शाखा अजून वाढविण्यासाठी प्रयत्न करू त्यासाठी मला काट्यावर बसण्याची सवय लागेल, त्यांनी सांगितल्याप्रमाणे अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत कोणतेही गालबोट लागू देणार नाही यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील यावेली नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी प्रत्यक्ष सह्याद्रीचा राखणदारशी बोलताना सांगितले, आलेल्या सर्व अतिथींचे आभार मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भोईर यांनी मानले.