वरोरा :- ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि शेतातील मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी. या उद्देशाने ग्रामीण कार्यानुभव अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथील कृषिदूत विद्यार्थी तालुक्यातील सालोरीच्या ग्रामपंचायत मध्ये दाखल होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कृषिदूतांमध्ये ऋतुजा कोरडे,अश्विनी मोहरकर,तन्वी कोलते,सुजाता मुंडरे,चेतना खुणे,आशिका मडावी आदी कृषीदुतांचा समावेश होता.त्यांचे स्वागत सालोरी येथील तलाठी प्रणाली तुडूंलवार यांनी केले.याप्रसंगी बंडू बावणे,माणिक रणदिवे,रामभाऊ मोगरे,संजय कोयचाडे, श्रीहरी कुळमेथे,ग्रामपंचायतचे कर्मचारी व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉ. पोद्दार,कार्यक्रम प्रभारी डॉ. आर.बी.महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस.एन.पंचभाई,कार्यक्रम अधिकारी डॉ. एम.एन.पोताने,डॉ. पी.के.अकोटकर,डॉ. एस. आर.इंगळे यांचे महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.