चंद्रपूर : गजानन कन्स्ट्रक्शन येथे कार्यरत असलेल्या ड्रायव्हरला कामावर असताना अटॅक आला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र गजानन कन्स्ट्रक्शनने मृतकास कुठलीही मदत देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका उज्वला प्रमोद नलगे यांच्या मध्यस्थीने सहा लाख रुपयांची मदत मृतकाच्या मुलीस मिळवून दिली.
चंद्रपूरातील लहुजी नगर येथील नीलकंठ जुमनाके (वय ५२) गजानन कन्स्ट्रक्शन येथे कामावर होते. ट्रक चालवीत असताना त्यांना अस्वस्थ जाणवू लागले. त्यानंतर त्यांनी ट्रक थांबविला. त्यात त्यांचा तिथेच अटॅक आल्याने मृत्यू झाला. मात्र गजानन कन्स्ट्रक्शनने मृतकाच्या कुटुंबीयास मदत देण्यास टाळाटाळ केली. ही बाब माहिती होताच शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका सौ उज्वला प्रमोद नलगे यांच्या नेतृत्वात मृतदेह गजानन कन्स्ट्रक्शनच्या ऑफिस मध्ये ठेवण्यात आला व कुटुंबीयास आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह इथेच ठेवण्याची भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली. शिवसेनेची आक्रमक भूमिका बघताच गजानन कन्स्ट्रक्शनने दोन लाख रूपये रोख व चार लाख रुपयांचा धनादेश अशी एकूण सहा लाख रुपयांची आर्थिक मदत मृतकाच्या मुलीस सुपूर्द केली.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका उज्वलाताई प्र. नलगे, विक्रांत सहारे युवा सेना जिल्हा समन्वयक, adv अजीत पांडे, सद्दाम कनोजे, ज्ञानेश्वर लोनगाडगे, सुश्मित गौरकार, रोहन नलगे, चेतन कामडी, आतिश चीमुरकर, एकनाथ देवतळे, रोनित नलगे, तुषार लोनगाडगे, शुभम घागरगुंडे, केतन शेरकी, कपिल शेरकी आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती. मृतकाची पत्नी मागील वर्षी कोरोना मध्ये मरण पावली. त्यांना दोन मुली असून एका मुलीचे लग्न झाले आहे तर एक २१ वर्षांची मुलगी आहे.