(चिमूर)- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफरझोन वनक्षेत्रात येत असलेल्या रामदेगी व संघारामगीरी या धार्मिक स्थळांच्या वनभुमीसह अनुसुचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारणा नियम २०१२ नुसार चिमुर तालुक्यातील बोथली (वहा) ग्रामसभेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन चार हजार पाचशे एकर वनभुमीवर सामुदायिक वनहक्क दावा उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष उपविभागीय स्तरीय वनहक्क समिती चिमुर यांचेकडे ग्रामसभा प्रतिनिधी शिष्टमंडळाने नुकताच सादर केला.
गावसमुहाच्या एकुण ९८४ सदस्यांनी सामुदायिक वनहक्क दाव्याचा मागणी संपुर्ण भरुन दिनांक ४/५/२०२२ रोजी स्थानिक वनहक्क समितीकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केला. त्यात सामुदायिक वनहक्क दावा-१ व वनहक्क कायद्याचे कलम ३(१)(क) नुसार वैयक्तिक वनहक्क दाव्यात रहिवाशांसाठी रामदेगी ९, संघारामगिरी-७ व उपजिविकेसाठी बोथली येथील २६ ९ वनहक्क दाव्यांचा समावेश आहे. त्यामुळे सामुदायिक व वैयक्तिक दाव्यांवर कार्यवाही करण्यासाठी वनहक्क समितीने नियम १२(१) नुसार प्राप्त वनहक्क दाव्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी दिनांक २० मे २०२२ रोजी सभा बोलावून मा.तहसिलदार चिमुर, मा. वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) खडसंगी, मा. उप अधिक्षक भुमी अभिलेख चिमुर, मा. संवर्ग विकास अधिकारी पं.स. चिमुर, मा. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) चिमुर, ग्राम पंचायत बोथली यांना पडताळणीचे वेळी नियम१२ (४) नुसार बोथली गावाचे संदर्भातील सर्व माहिती, अभिलेख, दस्ताऐवज, बंदोबस्त मिसल, राजस्व व वननकाशे यांच्या सत्यप्रती सोबत घेऊन पडताळणीचे वेळी वनहक्क समितीला सहकार्य करण्यासाठीच्या लेखी सुचना दिल्या होत्या. त्यामुळे वनहक्क समितीने सर्व दाव्यांची पडताळणी करुन समितीने नोंदविलेल्या निष्कर्ष अहवालावर ग्रामसभेत चर्चा करुन योग्य ठराव पारित करण्यासाठी दिनांक २१ मे २०२२ रोजी बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेत सर्वसंमतीने सामुदायिक व वैयक्तिक अशा सर्व ४३ वनहक्क दाव्यांना मंजुरी देऊन तसा ठराव मंजुर करण्यात आला.
बोथली (वहा) ग्रामसभेने केलेल्या सामुदायिक व वैयक्तिक वनहक्क दाव्यांतील सर्व तपशील योग्य असल्याची खात्री ग्रामसभा सचिव तथा बोथली ग्रा.पं. चे ग्रामसेवक भागवत नरड यांनी करुन वनहक्क दावे मान्य करण्याची शिफारस दाव्यांच्या मुळ प्रतीत आवश्यक दस्ताऐवजासह उपविभागीय अधिकारी तथा अध्यक्ष उपविभागीय स्तरीय वनहक्क समिती चिमुर यांचेकडे सर्व दावे सादर करण्यात आले. ही सर्व वनहक्क दाव्यांची प्रक्रिया अँड. विजय देठे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते माधव जिवतोडे व शंकर भरडे यांनी सांभाळली असुन ग्रामसभेला कायदेविषयक मार्गदर्शन केले.
गाव स्तरांवरील वनहक्काची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सरपंच तथा वनहक्क समितीचे सचिव विनोद देठे, वनहक्क समितीचे अध्यक्ष रामकृष्ण वाघ, उपसरपंच देविदास नन्नावरे, माजी सरपंच जागेश्वर थुटे, रामकृष्ण गेडाम, किशोर श्रीरामे, योगेश लाडसे, राहुल पोहणकर, आकाश आंबोलकर, पुंडलिक गेडाम, रविंद्र सोनवणे, अधिकार घोडमारे, सविता दोडके, बिंदीया भरडे, रसिका पोहणकर, मनोहर पाटील, रामकृष्ण गराटे, ईश्वर भरडे, किरण सोनवाने, शंकर गेडाम, अरुणा बोरेकर, इंदुबाई वाघ, अर्चना वाघ, सुषमा घरत, अरुण दोडके, बंडु सरपाते, नरेश वाकडे, प्रमोद गेडाम, पुंडलिक हजारे, योगेश बांदेकर, माणिक लढी, उमेश दडमल, कवडु शिवनकर, शशिकांत निशाने, मंगेश सांभारे, पुरुषोत्तम खिरटकर, संजय घानोडे, प्रकाश दोडके, कविता नन्नावरे या ग्रामसभा सदस्यांनी परिश्रम घेतले.