चंद्रपूर ;- चंद्रपूर -मूल महामार्गावर अजयपूर येथे डिझेल टॅंकर व लाकडाने भरलेला ट्रक यांच्यांत भीषण अपघात झाला होता. या अपघातात ९ जण जागीत भाजून मृत्युमुखी पडले होते. मृत्युामुखी पडलेल्याय ९ जणांच्याह कुटुंबीयांना प्रत्येंकी ५ लाख रुपये अर्थसहाय्य मुख्यपमंत्री सहायता निधीतून देण्यामची मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांच्याककडे केली होती. त्यानुसार आज उद्धव ठाकरे यांनी मुख्युमंत्री निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येीकी ५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे.
दिनांक १९ मे रोजी चंद्रपूरकडे येणा-या डिझेल टॅंकर व लाकुड भरलेल्या ट्रकच्या भिषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ९ व्यक्तींना तातडीने प्रत्येकी ५ लक्ष रूपयांचे अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन जाहीर करावे अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली@OfficeofUT pic.twitter.com/pLWgnQ72u5
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) May 20, 2022
चंद्रपूर जिल्ह्यातील अजयपूर गावाजवळ झालेल्याब भीषण अपघातादरम्या न मोठी आग लावून ९ मजुरांना भाजून मृत्यू झाला होता. या अपघातानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्य मंत्र्यांना पत्र पाठवून मुख्यसमंत्री निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यानची मागणी केली होती. मुख्ययमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारणे यांच्या्शी याबाबत त्यांनी चर्चादेखील केली होती. जिल्हा्धिकारी अजय गुल्हायने यांची भेट घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने याबाबतचा प्रस्तारव शासनाला पाठविण्याबची विनंती केली होती. त्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत मुख्यटमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्ययमंत्री सहायता निधीतून प्रत्येयकी ५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे.
डिझेलचा टँकर आणि लाकडे वाहून नेत असलेल्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही थरकाप उडविणारी घटना गुरुवारी १९ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर गावाजवळ घडली होती. लाकडे वाहून नेणारा ट्रक (एमएच ३१-सीक्यू २७७०) हा मूलमार्गे बल्लारपूरकडे जात होता. लाकडांच्या ट्रकमध्ये चालकासह सात मजूर होते. तर डिझेल भरलेला टॅंकर (एमएच ४० बीजी ४०६०) हा चंद्रपूरवरून मूलकडे येत होता. रात्री साडेदहाच्या सुमाराला ट्रक आणि टॅंकर चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर गावाजवळ समोरासमोर आले. तेथे दोन्ही वाहनांच्या चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले व दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, अपघातानंतर पाच मिनिटांत दोन्ही ट्रकनी पेट घेतला. लवकरच आगीने रौद्र रूप धारण केले. आत बसलेल्या मजूर आणि चालकांना ट्रकमधून बाहेर निघण्यासही वेळ मिळाला नाही. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आत मजुरांच्या किंकाळ्या फक्त ऐकू येत होत्या. परंतु, आगीची तीव्रता बघून त्यांना वाचविण्यासाठी कुणीच समोर जाऊ शकले नाही. मदतीअभावी दोन वाहनचालकांसह सात मजुरांचा शेकडो नागरिकांच्या डोळ्यांदेखत जागीच होरपळून मृत्यू झाला.
रात्रीच चंद्रपूर येथील अग्निशमन दलाची वाहने पोहोचली. मात्र, तोपर्यंत काहीच शिल्लक नव्हते. ट्रकच्या सांगाड्याला लागलेली आग विझविण्याचे काम सकाळपर्यंत सुरू होते. आगीची झळ महामार्गावरील झाडांनासुद्धा बसून ती झाडेसुद्धा होरपळली. अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक केळझरमार्गे वळविण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी आज सकाळी चंद्रपूर-मूल मार्गाची वाहतूक सुरळीत झाली. आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारणे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चाही केली होती. मुनगंटीवार यांनी रुग्णालयात जाऊन मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले होते.