वरोरा:-
महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा व्दारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना आनंदवन प्रकल्पामध्ये सामाजिक संशोधनाच्या दृष्टीने प्रकल्प भेटीचे आयोजन करण्यात आले होते या भेटी अंतर्गत विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण करून देणे तसेच संशोधन वृत्ती निर्माण करणे या उद्देशाने या भेटीचे नियोजन समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.रंजना लाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रकल्प भेटी मध्ये सर्वप्रथम आनंदवन मधील हॉस्पिटला भेट देण्यात आली. या हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या कुष्ठरोग्यांच्या उपचार बद्दल डॉ. विजय पोळ. यांनी विद्यार्थ्यांना कुष्ट रोगाबद्दल माहिती तसेच त्यावर होणाऱ्या उपचाराबद्दल तसेच त्याचे निदान कुष्ठरोगाची लक्षणे याबद्दल सर्व मार्गदर्शन त्यांनी केले. त्याचबरोबर कुष्ठरोग्यांना समाजात कशी वागणूक दिली जाते त्याबद्दल सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले त्यानंतर हॉस्पिटल मधील विविध विभाग हॉस्पिटल मधील नवीन हेल्थ ATM डिजिटल X-ray या मशिनरी बद्दल माहिती व कुष्ठरोग्यांना दिली जाणारी फिजियोथेरेपी याबद्दलची माहिती कदम सर यांनी सांगितली. त्या नंतर आनंदवन मधील बायोगॅस प्रकल्पाला भेट दिली या प्रकल्पामध्ये बायोगॅस कशी तयार केली जाते याबद्दल माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली या बायोगॅस प्रकल्पानं दर दिवसाला 150 किलो गॅसची निर्मिती केली जाते तसेच या गॅसचा उपयोग मेगा किचन मध्ये स्वयंपाक करण्यासाठी केला जातो दर दिवसाला जवळजवळ दहा सिलेंडर इतकी गॅस बायोगॅस निर्माण होत असते. त्यानंतर प्रकल्पामध्ये मेगा किचन ला भेट देण्यात आली या मेगा किचन मध्ये बायोगॅस च्या साहाय्याने जेवण बनविल्या जाते या किचन मध्ये दर दिवसाला जवळ जवळ 2000 लोकांचे जेवन बनविल्या जाते.त्या नंतर प्रकल्पातील Fabbric विभागाला भेट देण्यात आली या विभागचे काम रमेश अमरु हे सांभाळतात त्यांना जवळजवळ प्रकल्पांमध्ये हे काम करत असताना त्यांना 45 वर्ष झालेली आहे या विभागामध्ये रंगीबिरंगी कपड्याच्या साहाय्याने कलाकृती तयार केली जातात भेटीदरम्यान त्यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची बनवलेली सुंदर कलाकृती दाखवली आणि ही कशी बनवली जातात याबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती सुद्धा त्यांनी सांगितली. ह्या बनवलेल्या कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध असतात आणि यांना मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते असे त्यांनी सांगितले.
प्रकल्पातील ग्रीटिंग विभागाला भेट देण्यात आली या विभागांमध्ये आतापासून अतिशय सुंदर पद्धतीने ग्रीटिंग कार्ड तयार केले जातात आणि हे तयार करण्यासाठी गवत मक्याची तुस केळीचा पाला यापासून हे तयार केले जातात आणि यांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे या विभागातील कारागीर गनिच्छवारे यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर रेपिअर विणकर नियंत्रण विभागाला भेट देण्यात आली या विभागा मध्ये सुता पासून खादी कापडाची निर्मिती केली जाते या साठी आधुनिक मशिनच्या साह्याने कापडाची निर्मिती कशी केली जाते तसेच एका दिवसाला किती कापडाची निर्मिती होते, त्यासाठी लागणारा कच्चामाल कुठून आणला जातो याबद्दल की सर्व सविस्तर माहिती या विभागात विद्यार्थ्यांना तेथील कामगारांनी दिली आणि हा कापूस विक्रीसाठी आनंदवनमध्ये उपलब्ध होतात तशी सुद्धा त्यांनी सांगितले. त्यानंतर हातकाम विभागाला भेट घेण्यात आली यावेळी भागामध्ये पारंपारिक पद्धतीने हाताच्या साह्याने सतरंजी,चटईची निर्मिती केली जाते आणि या सतरंजी आणि चटई निर्मितीसाठी लागणारा धागा सुद्धा त्याच ठिकाणी तयार केला जातो या सतरंजी व चटई ला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे येथील कामगारांनी सांगितले. त्यानंतर स्वरानंद विभागाला भेट देण्यात आली स्वरानंद मध्ये आनंदवन मधील अंध अपंग कुष्ठरोगी कलाकार संगीत वाद्य,गायन, डान्स अतिशय उत्कृष्टपणे कसे करतात हे प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनी पाहिले. स्वरानंदच्या माध्यमातून कुष्ठरोगी,अंध,अपंग लोकांन मध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी डाँ. विकास आमटे यांनी स्वरांची निर्मिती केली या माध्यमातून आनंदान मधील कुष्ठरोगी,अंध, अपंग लोक यांना समाजात स्थान प्राप्त व्हावी या उद्देशाने तसेच त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्वरानंद निर्माण करण्यात आले आत्तापर्यंत जवळजवळ तीन हजार पेक्षा जास्त प्रोग्राम देशातील विविध ठिकाणी डॉ. विकास आमटे आणि सदाशिव ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे अतिशय सुंदरपणे गायन वाद्य वाजविणे डान्स हे लोक करतात हे विद्यार्थ्यांनी पाहिले. स्वरांची संपूर्ण धुरा आनंदवन मधील विश्वस्थ सदाशिव ताजणे हे सांभाळत त्यांनी विद्यार्थ्यांना स्वरानंद निर्मिती मागचा इतिहास सांगितला. प्रकल्पातील सगळे विभागाला भेटीदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये एका पद्धतीने संशोधक वृत्ती तसेच सामाजिक जाणीव निर्माण झाल्याचे जाणवले. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा.प्रमोद सातपुते, डॉ. प्रवीण मुधोळकर, प्रा. हर्षल चौधरी. प्रा.अमोल ठमके विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते..