भद्रावती : आजच्या जागतिकीकरणाच्या काळात इंग्रजी या विषयाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले असून जगात एकमेकांच्या संपर्कात रहायचे असेल तर इंग्रजी भाषा येणे फार आवश्यक आहे. काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान अद्ययावत करावे असे विचार गोंडवाना विद्यापीठातील भाषा अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य डॉ.राजेश सूर(अल्लापली) यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात इंग्रजी व आयक्यूएसी विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयक्यूएसी समन्वयक प्रा.मोहित सावे होते. पुढे बोलताना डॉसूर म्हणाले म्हणाले की, ‘मराठी ही आपली मातृभाषा आहे.तिच्यावरही आपले प्रेम असावे.परंतु काळाची गरज लक्षात घेता इंग्रजी भाषेत नैपुण्य आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक इंग्रजीचे ज्ञान अद्ययावत करावे’असा सल्ला दिला.कार्यक्रमाचे संचालन रीमा रोपंकुटीवार, पाहुण्यांचा परिचय डॉ.गजानन खामनकर, आभारप्रदर्शन पल्लवी अस्वले हिने केले. या व्याख्यानास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.