गोंडपिपरी :- तथागतांनी बुध्द धम्माची स्थापना केली.त्यांनी सांगितलेल्या विचारांनी मानवजातीचे कल्याण झाले.सम्राट अशोकांनी संपुर्ण आशिया खंडात धम्माचा प्रसार केला.बुध्द धम्म विज्ञानावर आधारीत आहे.जसा विज्ञानाचा विकास होत आहे.तशी बुध्द धम्माची व्याप्ती वाढत आहे.तथागताचा मानवी कल्याणाच्या विचार हा जगाची गरज बनला आहे यातुनच अनेक राष्ट्र तथागताच्या धम्माचा अवलंब करित आहेत.असे मत सामाजिक कार्यकर्ता गमतीदास फुलझेले यांनी व्यक्त केले.
पंचशिल बुध्द विहारात बुध्द जयंती कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी ते बोलत होते.चंद्रपूरचे भंते आर्यसुत्त थेरो अध्यक्षस्थानी होते.भारत झाडे,हनुमंतू झाडे,विशाखा फुलझेले,कल्याणी दुर्गे,राकेश बांबोळे,तोषवीनाथ झाडे,भारत झाडे,मोरेश्वर दुर्गे,राजू झाडे,झावरू उराडे,नितेश डोंगरे,प्रविण भसारकर,रूपेश निमसरकार,
माया रामटेके,शैलेश झाडे, आलोक खोब्रागडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन भारतीय बौध्द महासभा गोंडपिपरी च्या वतीन करण्यात आले.